परवा "CODE मंत्र" हे मराठी नाटक पाहिले. code मंत्र पाहिल्यावर मी काही वेळ सुन्न झाले होते. काही नाटके नाट्यमंदिरात पाहिल्यानंतरही त्यांचा प्रभाव पुढे अनेक दिवस टिकून राहतो त्यापैकीच हे एक नाटक. मला विलक्षण आवडलेले.. आणि अस्वस्थ करणारे तरीही विचार करायला लावणारे....
"A few good men" या मूळ इंग्रजी नाटकाची प्रेरणा घेऊन सध्या गुजराती भाषेत चालू असलेल्या नाटकाचे हे मराठी रूपांतर... नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, दिग्दर्शन, अभिनय,संवाद, पार्श्वसंगीत, कथा अशा सर्व बाजूंनी परिपूर्ण असलेली विलक्षण अद्भुत कलाकृती... मी काही चित्रपट-नाटकांची समीक्षक नाही पण मला नाटक पाहायला आवडते आणि आवडलेलं नाटक इतरांनीही पाहावं असं मला नेहमी वाटतं. म्हणून हा लेखप्रपंच...
सैनिकांची शिस्त, शौर्य, देशभक्ती, त्याग आणि सर्वस्व वाहून केलेली देशसेवा आपल्याला परिचित असते. किमान आपण त्याबद्दल ऐकून असतो. त्यांची कर्तव्यनिष्ठा वाखाणण्यासारखी असते पण कर्तव्याचा अतिरेक झाल्यावर काय घडू शकतं याची ही एक कथा... कर्तव्यपूर्तीमध्ये नाती बाजूला ठेवून नियमांचे पालन करताना व्यक्तीला कोणत्या दिव्यातून जावे लागते हे या कथेत पाहायला मिळते. नाटक पाहायला सुरुवात होण्याआधीच पार्श्वसंगीतामुळे आपण थेट मराठा रेजिमेंटच्या तळावर दाखल होतो आणि पडदा उघडताक्षणीच समोर दिसतो तो भव्य सेट. प्रसंगांची गुंफण इतकी सुंदर आणि अंधार न करता सेटची प्रसंगानुरूप अलगद आणि तितक्याच शिस्तीत आखणी केली आहे की एक क्षणही आपण कथेपासून विचलित होत नाही. कथेतील वकील अहिल्या देशमुख (मुक्ता बर्वे) एका सैनिकाच्या खुनाची केस उलगडून आरोपीला सोडवू पाहत असताना एकेक धागादोरा असा पकडतात, त्यातून प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते.

(छायाचित्र सौजन्य: Code Mantra-Marathi च्या फेसबुक पेजवरून )
एकामागोमाग एक नवनवीन धक्के आपण पचवत जातो आणि शेवटी मिलिटरी लॉ एक्स्पर्ट अहिल्या देशमुख आणि कर्नल प्रतापराव निंबाळकर यांच्या जुगलबंदीतून सत्य बाहेर येते. कोर्टमार्शल होताक्षणीच एक शेवटचा जबरदस्त धक्का बसतो आणि आपण सुन्न होतो. कथा आणि कथेचा शेवट सांगितला तर पाहण्याची मजा नवीन प्रेक्षकांना अनुभवता येणार नाही म्हणून सांगण्याचा मोह आवर्जून टाळतेय; पण या वर्षातील आणि आत्तापर्यंतचे मी पाहिलेले हे सर्वोत्तम नाटक आहे हेही खरे. नाटकातील प्रत्येक पात्राची भूमिका महत्वाची आहे आणि ती सर्व पात्रे तितकीच खरी वाटतात. अजय पुरकर आणि मुक्ता बर्वे यांची कामे तर लाजवाब आणि बिनतोड...
एक थरार नाट्य आणि नाट्यकलेची उत्कृष्ठ कार्यशाळा म्हणून हे नाटक प्रत्येक रसिक प्रेक्षकाने आणि अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक सर्वांनी आवर्जून पाहावे असेच आहे.
"A few good men" या मूळ इंग्रजी नाटकाची प्रेरणा घेऊन सध्या गुजराती भाषेत चालू असलेल्या नाटकाचे हे मराठी रूपांतर... नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, दिग्दर्शन, अभिनय,संवाद, पार्श्वसंगीत, कथा अशा सर्व बाजूंनी परिपूर्ण असलेली विलक्षण अद्भुत कलाकृती... मी काही चित्रपट-नाटकांची समीक्षक नाही पण मला नाटक पाहायला आवडते आणि आवडलेलं नाटक इतरांनीही पाहावं असं मला नेहमी वाटतं. म्हणून हा लेखप्रपंच...
(छायाचित्र सौजन्य: Code Mantra-Marathi च्या फेसबुक पेजवरून )

(छायाचित्र सौजन्य: Code Mantra-Marathi च्या फेसबुक पेजवरून )
एकामागोमाग एक नवनवीन धक्के आपण पचवत जातो आणि शेवटी मिलिटरी लॉ एक्स्पर्ट अहिल्या देशमुख आणि कर्नल प्रतापराव निंबाळकर यांच्या जुगलबंदीतून सत्य बाहेर येते. कोर्टमार्शल होताक्षणीच एक शेवटचा जबरदस्त धक्का बसतो आणि आपण सुन्न होतो. कथा आणि कथेचा शेवट सांगितला तर पाहण्याची मजा नवीन प्रेक्षकांना अनुभवता येणार नाही म्हणून सांगण्याचा मोह आवर्जून टाळतेय; पण या वर्षातील आणि आत्तापर्यंतचे मी पाहिलेले हे सर्वोत्तम नाटक आहे हेही खरे. नाटकातील प्रत्येक पात्राची भूमिका महत्वाची आहे आणि ती सर्व पात्रे तितकीच खरी वाटतात. अजय पुरकर आणि मुक्ता बर्वे यांची कामे तर लाजवाब आणि बिनतोड...
एक थरार नाट्य आणि नाट्यकलेची उत्कृष्ठ कार्यशाळा म्हणून हे नाटक प्रत्येक रसिक प्रेक्षकाने आणि अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक सर्वांनी आवर्जून पाहावे असेच आहे.

No comments:
Post a Comment