Thursday, 12 February 2015

आमचे पक्षीनिरीक्षण

 ८ फेब्रुवारी २०१५
          BNHS चा flamingo watch  programme  होता. फ्लेमिंगो पाहायला जायचं म्हणून सकाळी लवकर campus मधून निघाले पण गडबडीत mobile ला charging करायचं राहून गेलं  होतं. मग सकाळी सकाळी गोड संगीत ऐकण्याचा कार्यक्रम फसला. रोजचाच तो IIT चा campus पण आपण नवीन काहीतरी करायला निघालो की तो ही नवीन भासू लागतो. इकडे तिकडे पाहत मी चालले होते अचानक लक्षात आले की मी reporting कुठे करायचं आहे हे पाहायला विसरले, शिवडी स्टेशन (East) एवढंच लक्षात होतं माझ्या ! बरं , मी एकटी असते तर ठीक होतं, मी शोधून तरी जाईन  किंवा दुसरीकडे कुठेतरी फिरून येईन पण यावेळी शरयू होती माझ्यासोबत . तिला मी main gate वर भेटणार होते. पोहचेपर्यंत net वर शोधू म्हटलं आणि थोडी काळजी कमी झाली.
             आम्ही शिवडी ला पोहोचलो आणि स्टेशन वर पोहोचताच रेल्वे crossing जवळ एक घोळका दिसला. मी ओळखलं हे सर्व BNHS programme साठीच आलेले लोक आहेत. या आधी एकदा वसई ला मी जाऊन आलेले असल्याने यांना ओळखणे मला कठीण नव्हते. एका गल्लीतून mudflat कडे जायच्या मार्गावर आम्ही त्या Guides ना follow करत निघालो. 
                      इकडे सगळीकडे धुकं दिसत होतं आणि थंडी जाणवत होती. त्यात सूर्योदयाचा फोटो काढला मी… खूप सुंदर दृश्य होतं ते

तिथून पुढे सर्व oil transport करणारे truks  उभे होते. अन मग पुढे जुन्या-नव्या बोटी, जहाजे बंदराला लागून रुबाबात दिसत होत्या. 


सकाळचे ८ वाजले होते पण धुक्यामुळे समोरचं काही दिसत नव्हतं. कुठेतरी पक्ष्याची हालचाल जाणवली कि त्याला फ्लेमिंगो म्हणून आम्ही मनाचं समाधान करून घेत होतो. बगळे, कावळे , कबुतर, sandpiper, समुद्रपक्षी (seagull ),whimbrel  सगळे पक्षी पाहून झाले पण फ्लेमिंगो काही दिसेनात.  हळूहळू सूर्यनारायण ढगांमधून डोके वर काढू लागले. धुकं कमी होऊ लागलं आणि दूरवर एका ठिकाणी फ्लेमिंगो दिसू लागले. हजारोंच्या संख्येने ते पाहायला मिळतात. अन १०-१५ ते ६०-७० च्या गटांनी ते एका ठिकाणाहून दुसरीकडे उडून जातात. आमच्या समोरून ते असेच जाताना आम्हाला पाहायला मिळाले पण आकाशातून खाली उतरल्यावर मात्र ते जवळून पाहायचं भाग्य त्यादिवशी नाही मिळालं.  त्यातील ही काही क्षणचित्रे.…. 


 BNHS  च्या मार्गदर्शकांनी खूप उपयुक्त माहिती सांगितली. दूरवर दिसणारे पक्षी पाहण्यासाठी त्यांनी telescope  आणि binoculars आणल्या होत्या.  त्यातून ते सुंदर पक्षी आम्हाला पाहायला मिळाले . मी कॅमेऱ्यातून शक्य तेवढे  zoom  करून काही फोटो काढले. पण पक्षी पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर सोबतीला एक दुर्बीण हवीच याची जाणीव होत होती. 



बाकी ज्या पक्षांनी आम्हाला काही वेळ गुंतवून ठेवले त्यात बगळ्याचा वरचा क्रमांक लागेल. त्याचे काही फोटो .. 



असेच आणखी सुंदर काही पक्षी… 



आपल्याला पक्ष्यांबद्दल खूपच त्रोटक माहिती आहे याची तीव्र जाणीव झाली आणि तिकडून परतीच्या मार्गावर ठरवले विविध पक्ष्यांची माहिती देणारे एखादे पुस्तक घेऊन वाचायचं . सलीम अलींचे भारतीय पक्षी मिळाले तर उत्तमच !!!!!

Sunday, 1 February 2015

चिमण्या आणि मांजरे

सुट्टीमध्ये घरी मस्त फोटो काढत बसायचे . बाबांना दाखवायचे अन उगीच स्वत:च कौतुक करून घ्यायचं . १५ दिवसच  सुट्टी मिळाली पण मजेत गेली .त्यातलेच काही फोटो इथे पोस्ट करते . पक्षी निरीक्षणाचा छंद कुठून जडला ते आठवत नाहीये पण छोट्या छोट्या  गोष्टीचा आनंद घ्यायला बाबांकडे पाहून शिकले . या पाखरांकडे पाहत बसलं की वेळ कसा चटकन निघून जातो कळत नाही


 
 
या चिमण्या दारात आल्या नाही ,चिवचिवाट झाला नाही तर चुकल्यासारखं वाटतं . ४-५ वर्षांपासून अखंडपणे यांना आठवणीने दाणे टाकायचं काम करतात आई आणि बाबा … यावर्षी मांजरांच्या ३ पिल्लांनी यांना घाबरवून सोडलं . सकाळचा किलबिलाट कमी होऊ लागला . पण काही दिवसांनी ती पिल्ले गेली दुसरीकडे न यांचं routine पुन्हा सुरु. 
 


ही मांजरे पण मजेशीर ... अशीच नजर रोखून पहायची माझ्याकडे नेहमी …