Thursday, 18 August 2016
बहिण- भावाचं नातं
माझ्या आजीच्या जात्यावरील ओव्यांमध्ये बहिण- भावाचं नातं सांगणाऱ्या ओळी सापडल्या..त्या सादर करायला आजच्याइतका चांगला दुसरा मुहूर्त नाही.
इठू सावळा बंधू येवो
म्या का देखली दरवाज्यात,
हाती चंदनाचा पाट
झारी बुडविली रांजणात,
बंधूच्या भोजनाला
जिरं-साळीचा करती भात,
हिंग-जीऱ्याचं तिखट
भाजी यीळती तीनशे साठ,
झालं बंधूचं भोजन
चंद्रभागेचं पाणी टाक,
हातही पुसायला
शेला धुवट बारीक,
पिकल्या पानाचं देठ तोडी
चिकणी सुपारी चिकट,
दारी दवण्याचं झाड
चुना कळीचा तिखट,
गेला मातेला सांगत
बहिण असावी जलमात...
सर्व बहिण भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment