माझा मोबाईल…
काही गोष्टी आपल्यासोबत खूप दिवस राहतात. माझा मोबाईल त्यापैकीच एक. Sony Ericsson Live with Walkman चा एक सुंदर फोन गेली तीन साडेतीन वर्षे माझ्याकडे आहे. माझ्या बहिणीने तो मला घेऊन दिलेला. आकर्षक शुभ्र देहयष्टी, खणखणीत आवाज आणि आणखी बऱ्याच उपयुक्त गुणांमुळे तो सदैव माझा प्रिय आहे. तो तसाच सुंदर शुभ्र राहावा म्हणून मी त्याला खूप जपला.

तो अनेकदा माझ्या हातातून पडलादेखील, पण कव्हर आणि स्क्रीनगार्ड असल्यामुळे त्याला अजूनही कुठे इजा किंवा दुखापत झालेली नाहीये. आज मात्र तो फोन अगदीच निकामी झाल्यासारखा वाटतोय. सकाळी बसमधून येताना तो रेंज पकडत नव्हता. किमान २५ वेळा तो बेशुद्ध होऊन थोड्या वेळात शुद्धीवर यायचा. मला वाटलं वयोमानामुळे त्याला आता प्रवास झेपत नसावा. प्रवासात असताना कदाचित त्याला प्रत्येक ठिकाणी वेगळ्या tower चे नेटवर्क पकडावे लागत असेल. मी त्याची बैटरी काढून ठेवली. लोणावळ्यात बस थांबल्यावर मी पुन्हा त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण त्याची परिस्थिती काही सुधारली नाही. आता होस्टेलवर पोहचल्यावर त्याला खाऊ पिऊ घातले (फुल चार्ज केला ) पण अजूनही त्याची गत तशीच आहे. मला वाटते हा आता थोड्या दिवसांचा सोबती आहे. त्याला जास्त मेहनत करावी लागू नये अशी काळजी मला आता घ्यावी लागेल. मोबाईल सारख्या वस्तू replace करता येतात, त्यामुळे काही दिवसांनी याची जागा दुसरा कोणतातरी फोन घेईल. मी याला हळूहळू विसरूनही जाईन. पण त्याने वेळोवेळी मला केलेली मदत लाखमोलाची आहे. त्याची नोंद घ्यावीच लागेल म्हणून हा छोटासा लेख…

No comments:
Post a Comment