चीनमध्ये हस्तांदोलन करताना "समोरच्या व्यक्तीला सहा सुखे मिळोत" अशा शुभेच्छा देतात, असं शांता शेळकेंच्या लिखाणातून कळलं. सामान्यत: माणसाला आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, सुविद्य पती / पत्नी आणि गुणी, आज्ञाधारक मुले ही पाच सुखे मिळावीत अशीच इच्छा असते; मग हे सहावे सुख कोणते? त्यांच्या कल्पनेनुसार हे सहावे सुख ज्याचे त्याला उमगावे आणि त्याला ते मिळावे असा त्या शुभेच्छांचा अर्थ असतो.
नाहीतर जीवन संपत आल्यावर "अरे, जगणे राहूनच गेले" असे वाटते. जे काही केले ते संसारासाठी , मुलाबाळांसाठी केले. स्वत:साठी जगणे जमलेच नाही. आपल्या सुखासाठी कधी थोडावेळ काढलाच नाही अशी खंत वाटते. हे आपले सुख नेमके कशात आहे याचा ज्याचा त्याने मागोवा घ्यावा आणि त्याला ते सुख प्राप्त व्हावे अशी भावना त्या अभिष्टचिंतनातून व्यक्त होते.
माझ्या जीवन प्रवासातील सोबत्यांनाही माझ्याकडून हेच अभिष्टचिंतन…
व्हिक्टर फ्रान्केल या मानसशास्त्रज्ञाच्या मते माणूस हा अर्थपुर्णतेच्या शोधातील प्राणी आहे. (An animal in search of Meaning)
जिंदगी वसूल झाली पाहिजे हे वाचून जेव्हा मी माझ्या आयुष्याबद्दल विचार करायला लागले. आपले जीवन अर्थपूर्ण असले पाहिजे याची जेव्हा जाणीव झाली तेव्हापासून मीही माझ्या या सहाव्या सुखाच्या शोधात आहे. तुम्हालाही तुमचे सहावे सुख लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना…
Very nice.........जिंदगी वसूल झाली पाहिजे.............
ReplyDeleteThanks Dear...
Delete