खंड्या…
या खंड्याची गंमत अशी होती की ज्यादिवशी आम्ही काम करेल त्याचदिवशी तो दिसायचा. इतर वेळी फक्त फिरायला म्हणून आम्ही बाहेर पडलो तर त्याचं दर्शन दुर्मिळ… नाहीतर असं व्हायचं जेव्हा आम्ही कामासाठी सकाळी बाहेर पडू आणि तो दिसला कि समजायचं आज आपलं काम नक्की होणार.
एके दिवशी सकाळी सकाळीच शिवारफेरी साठी घराबाहेर पडलो. रस्त्यात अचानक दोन पक्षी दिसले. एवढे दिवस मला वाटायचं की या भागात एकच खंड्या आहे. तोच इकडे तिकडे फिरताना दिसतो. पण आज एकदम दोन दिसले आणि थोडा पुढे गेल्यावर त्याहून आकाराने थोडे मोठे असलेले आणखी दोन. आज माझी दिवाळीच होती. पण ते थोडे दूर असल्याने नीटसे टिपता आले नाहीत. पण त्यांना उडताना पाहण्याचा मात्र मी मनमुराद आनंद घेतला. ती लांब चोच, तो निळा आणि पिंगट रंग आणि कंठाचा शुभ्र पांढरा रंग… वा !! निसर्गाची किमयाच भारी… त्याच्यासारखी रंगसंगती दुसऱ्या कोणाला जमणार!
एके दिवशी छोटा उदेपूरला गेलो आणि दिवसभर कामासाठी फिरत राहिलो. छोटाउदेपूर हे जिल्ह्याचं ठिकाण असूनही तिथे हॉटेल किंवा रेस्टोरंटचा पत्ताच नव्हता. तिथला एका खमण स्पेशल दुकानातून घेतलेल्या एक प्लेट ढोकळ्यावर दिवसभर हिंडलो. घरी परत आलो तर येता येता माझ्या डोक्यात विचार चालू होते कामे तर चांगली झाली पण आज गावात फिरलो नाही त्यामुळे खंड्या काही दिसला नाही.. असं म्हणत म्हणतच मी घराचं ते लाकडी फाटक उघडलं आणि पाहते तर काय! खंड्या चक्क घरी…!!! घरासमोरील झाडांमध्येच उभ्या तिरप्या एका कळकावर तो बहुदा माझीच वाट पाहत बसलेला असावा.
दोन फोटो क्लिक केले. तो उडून गेला. मी खुश होते, आज तो दिसला याचे समाधान होते तर तो पुन्हा आला आणि लाईटच्या तारेवर येउन बसला. मला राहवले नाही , मी पुन्हा घरात जाऊन कॅमेरा घेऊन आले. भूक लागली होती. आवरून दुसऱ्या कामाच्या तयारीला लागायचं होतं पण मी मात्र खंड्याच्या मागे लागले होते. त्याचा एक सुंदर फोटो मला काढता यावा एवढीच माझी इच्छा होती.
अगदी मलाजातील शेवटच्या दिवशीसुद्धा आम्ही गावात न फिरता तेजगढला अकॅडेमी मध्ये आलो असताना तिथेही आम्हाला खंड्या दिसला. पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी याची आवड मला कधीपासून लागली कोणास ठाऊक… पण हा field stay खंड्यामुळे माझ्यासाठी अविस्मरणीय राहील एवढं मात्र नक्की…
माझ्या मलाजा गावातील मुक्कामात खंड्या हा एक वेगळा chapter बनला. त्यामुळे त्यासाठी एक separate post पाहिजेच. प्रत्येक बारा कोसावर मराठी भाषा बदलत जाते, याचे पक्षिविश्वाशी निगडित उत्तम उदाहरण म्हणजे खंडया पक्षी. किंगफिशर या पक्ष्याला काही लोक खंड्या म्हणतात, काही जण बंड्या, बंडू तर काही धीवर नाव सांगतात. पक्ष्यांची प्रमाण नावे शोधताना महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी या पक्ष्याला धीवर हे नाव दिले आहे. धीवर म्हणजे मासे पकडणारा... त्यामुळे आता खंड्या नाही; तर मराठीत धीवर या नावाने किंगफिशर ओळखला जाणार आहे.
हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. हे पक्षी युरेशियात पसरलेला आहे तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे.
खंड्या हे सामान्य नाम असून या पक्षाच्या विविध जातींपैकी पांढर्या छातीच्या खंड्याला नुसते खंड्या या नावाने ओळखतात. याच्या इतर जातभाईंची नावे लहान खंड्या, कवडा खंड्या , काळ्या डोक्याचा खंड्या, तिबोटी खंड्या, घोंगी खंड्या , मलबारी खंड्या अशी आहेत.
स्थानिक राठवी भाषेत त्याला लक्कडखोद म्हणत होते. मलाजामध्ये राहायला गेल्यानंतर ५-६ दिवसांनीच पहिल्यांदा मी तिथे खंड्याला पाहिलं. त्या आधी एकदा मी पडवळपाड्याला एक खंड्या पाहिला होता. एका घरी household survey करण्यासाठी म्हणून मी गेले असता जवळील विहिरीतून तो उडून एका झाडावर बसलेला मी पाहिला. जसा तो मला पहिल्यांदा दिसला तसा तो अनेकदा दिसला. दिसला म्हणण्यापेक्षा माझी नजर त्याच्याच शोधात असायची असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हातात कॅमेरा असेल तेव्हा मी जेवढे जमतील तेवढे त्याचे फोटो काढले. पण जवळ जाताच तो उडून जायचा. आणि उडणाऱ्या खंड्याचे फोटो घेणे मला जमलेच नाही. पण उडताना त्याने पसरलेल्या पंखावर दिसणारा शांत निळा रंग पाहून मी भारावून जायचे, हरखून जायचे आणि पाहतच राहायचे.
या खंड्याची गंमत अशी होती की ज्यादिवशी आम्ही काम करेल त्याचदिवशी तो दिसायचा. इतर वेळी फक्त फिरायला म्हणून आम्ही बाहेर पडलो तर त्याचं दर्शन दुर्मिळ… नाहीतर असं व्हायचं जेव्हा आम्ही कामासाठी सकाळी बाहेर पडू आणि तो दिसला कि समजायचं आज आपलं काम नक्की होणार.
एके दिवशी सकाळी सकाळीच शिवारफेरी साठी घराबाहेर पडलो. रस्त्यात अचानक दोन पक्षी दिसले. एवढे दिवस मला वाटायचं की या भागात एकच खंड्या आहे. तोच इकडे तिकडे फिरताना दिसतो. पण आज एकदम दोन दिसले आणि थोडा पुढे गेल्यावर त्याहून आकाराने थोडे मोठे असलेले आणखी दोन. आज माझी दिवाळीच होती. पण ते थोडे दूर असल्याने नीटसे टिपता आले नाहीत. पण त्यांना उडताना पाहण्याचा मात्र मी मनमुराद आनंद घेतला. ती लांब चोच, तो निळा आणि पिंगट रंग आणि कंठाचा शुभ्र पांढरा रंग… वा !! निसर्गाची किमयाच भारी… त्याच्यासारखी रंगसंगती दुसऱ्या कोणाला जमणार!
एके दिवशी छोटा उदेपूरला गेलो आणि दिवसभर कामासाठी फिरत राहिलो. छोटाउदेपूर हे जिल्ह्याचं ठिकाण असूनही तिथे हॉटेल किंवा रेस्टोरंटचा पत्ताच नव्हता. तिथला एका खमण स्पेशल दुकानातून घेतलेल्या एक प्लेट ढोकळ्यावर दिवसभर हिंडलो. घरी परत आलो तर येता येता माझ्या डोक्यात विचार चालू होते कामे तर चांगली झाली पण आज गावात फिरलो नाही त्यामुळे खंड्या काही दिसला नाही.. असं म्हणत म्हणतच मी घराचं ते लाकडी फाटक उघडलं आणि पाहते तर काय! खंड्या चक्क घरी…!!! घरासमोरील झाडांमध्येच उभ्या तिरप्या एका कळकावर तो बहुदा माझीच वाट पाहत बसलेला असावा.
दोन फोटो क्लिक केले. तो उडून गेला. मी खुश होते, आज तो दिसला याचे समाधान होते तर तो पुन्हा आला आणि लाईटच्या तारेवर येउन बसला. मला राहवले नाही , मी पुन्हा घरात जाऊन कॅमेरा घेऊन आले. भूक लागली होती. आवरून दुसऱ्या कामाच्या तयारीला लागायचं होतं पण मी मात्र खंड्याच्या मागे लागले होते. त्याचा एक सुंदर फोटो मला काढता यावा एवढीच माझी इच्छा होती.
अगदी मलाजातील शेवटच्या दिवशीसुद्धा आम्ही गावात न फिरता तेजगढला अकॅडेमी मध्ये आलो असताना तिथेही आम्हाला खंड्या दिसला. पक्षी निरीक्षण आणि फोटोग्राफी याची आवड मला कधीपासून लागली कोणास ठाऊक… पण हा field stay खंड्यामुळे माझ्यासाठी अविस्मरणीय राहील एवढं मात्र नक्की…
तुझ्या field stay मधील आणखी अनुभव जाणून घेण्यास आतुर आहे .. अगदी तू जशी आतुर होतीस खंडयाच्या दर्शनासाठी ...
ReplyDeleteनक्की share करेन!!
Delete